एक काळ असा होता की वृद्धापकाळाशी आजारांचा संबंध असायचा. मात्र, आजकाल तरुण वयात मधुमेह, थायरॉईड, बीपी, कोलेस्ट्रॉल, हृदयविकार, गुडघेदुखी आदी समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

Sep 21,2023


खराब जीवनशैली आणि आहार हे याचे कारण आहे. झोपणे, उठणे, खाणे-पिणे या वाईट सवयींमुळे आपल्या एकूणच आरोग्यावर परिणाम होतो


त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. अशा परिस्थितीत शरीर रोगांशी लढण्यास सक्षम राहत नाही. परिणामी आपल्याला हळूहळू विविध आजारांनी घेरले जाते.


बहुतेक आरोग्य तज्ञांचा असा विश्वास आहे की, या समस्या टाळण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आपल्या जीवनशैलीतील काही सवयी बदलणे.


पण हेल्दि लाईफस्टाइल जगण्यासाठी फक्त व्यायाम करणे पुरेसे नाही.


नॅशनल जिओग्राफिक एक्सप्लोरर आणि बेस्टसेलिंग लेखक डॅन यांच्या अनुसार खूप वर्ष जगण्याचे काही दुसरे उपायही आहेत.


जे लोक 100 वर्षांपेक्षा जास्त जगले आहेत त्यांच्यात काही गोष्टी समान आहेत असे डॅन बुएटनर यांच्या संशोधनात सिद्ध झाले आहे.


100 वर्षांपेक्षा जास्त जगणाऱ्यांमध्ये दररोज एक ग्लास वाईन पिण्याची सवय होती. सोबतच ते टेंशन घ्यायचे नाहीत व त्यांना नाच करण्याची आवड होती.


बुएटनर यांच्या अनुसार फक्त वाईन प्यायल्याने आयुष्य वाढण्यास मदत होत नाही ; तर त्यासोबत आरोग्यदायी कार्ब्स, मध, रताळे, धान्य यांसारखे पदार्थही खायला हवे.

VIEW ALL

Read Next Story