जीभ पांढरी होण्याची सर्वात सामान्य कारणे म्हणजे धूम्रपान आणि कोरडं तोंड.
ओरल लाइकेन प्लानस ही एक सूज आणणारी स्थिती आहे जी तोंड आणि जीभेला प्रभावित करते.
तंबाखू आणि अल्कोहोलमुळे होणाऱ्या ल्युकोप्लाकियाने जिभेवर जाड, पांढरे डाग दिसतात.
ओरल थ्रश ही आणखी एक स्थिती असून ज्यामुळे जीभ पांढरी दिसू शकते. हा बुरशीजन्य संसर्ग मानला जातो.
सिफिलीस हा लैंगिक संक्रमित संसर्ग (STI) असून तोंडासह शरीराच्या अनेक भागात लक्षणे दिसू शकतात.
तोंडाच्या किंवा जिभेच्या कॅन्सरमुळे जीभ पांढरी होऊ शकते.