शरीराला पोषक तत्वे पुरवण्याबरोबरच रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी डाळींचे सेवन करणे फायद्यांचे ठरते. रोजच्या आहारात डाळींचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.
मसुराची डाळ पुरुषांसाठी खूपच लाभदायक ठरते. या डाळीच्या सेवनामुळं अनेक समस्यांपासून आराम मिळतो.
स्पर्म मोटोलिटी वाढवण्यासाठी पुरुषांनी या डाळीचे पाणी प्यायले पाहिजे. बदलत्या जीवनशैलीमुळं पुरुषांमध्ये स्पर्म काउंट घट होण्याची समस्या अधीक तीव्र होत आहे. मसूराच्या डाळीमुळं ही समस्या आटोक्यात येऊ शकते.
सतत थकवा येत असेल तर तुम्ही आत्ताच आहारात मसूराच्या डाळीचे सेवन करु शकता.
डोळ्यांना सूज आली असेल तरीदेखील तुम्ही मसूर डाळीचे पाणी पिऊ शकता.
रोज मसूरच्या डाळीचे सेवन केल्यास कंबर आणि पाठदुखीमुळं आराम मिळतो.
पुरुषांच्या प्रजनन क्षमतेसाठीही मसूराचे पाणी खूप फायदेशीर आहे.
रक्ताची कमतरता असेल तर रोजच्या आहारात तुम्ही मसूरच्या डाळीचे सेवन करु शकता.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)