सकाळी गरम पाणी पिण्याचे खुप फायदे आहेत तर दररोज याची सवय सुद्धा चांगली आहे. गरम पाण्यामुळे आपली पचनक्रिया स्वस्त रहाते आणि बॉडी मध्ये मेटाबॉलिज्म बुस्ट होतं.
गरम पाण्यामुळे बॉडी मधील सर्व निरुपयोगी पदार्थ बाहेर पडतात आणि बॉडी हायद्रेटेड रहायला मदत करतं. कही वेळा सकाळी गरम पाणी पिताना काही चुका होतात आणि फायद्याच्या जागी तोटा होतो.
सकाळी पाणी पिताना हे लक्षात ठेवा कि पाणी जास्त गरम नसावं. पणी जास्त गर्म असल्याने तोंड, गळा आणि जायजेस्टिव ट्रैकचे सॉफ्ट टिशूज डैमेज होऊ शकतात.
तुम्ही कसं आणि कोणत्या कॉलीटीचं पाणी पिताय हे पण खुप गरजेचं आहे. तुम्ही साफ आणि स्वच्छ पाणी पिण गरजेचं आहे.पाण्याला आधी छान ऊकळुन कोमट करुण प्यावं
आपलं तोंड रात्रभर बंद अस्तं ज्यामुळे त्यात बॅक्टीरिया तयार होतात जे सकाळी पाण्या सोबत पोटात जाऊ शकतात ज्यामुळे तुम्हाला त्रास होतो त्यामुळे ब्रश केल्या नंतरच पाणी प्या. काही लोकांना असे वाटते की सकाळी उठल्यानंतर सामान्य पाणी पिणे देखील फायदेशीर आहे. पण आम्ही तुम्हाला सांगतो की सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिणे पाचन तंत्रासाठी फायदेशीर आहे.
गरम पाण्याचे सेवन मर्यादित प्रमाणात करणे महत्त्वाचे आहे. तसेच आवश्यक. पाणी हळूहळू प्या जेणेकरून तुमच्या शरीराला पाणी शोषण्यास वेळ मिळेल.
प्लास्टिकच्या डब्यात गरम पाणी पिण्याची चूक कधीही करू नका, यासाठी स्टीलचा ग्लास वापरा. तुम्ही नेहमी सकाळी रिकाम्या पोटी गरम पाणी प्यावे, तरच तुम्हाला त्याचे फायदे मिळू शकतात. तुम्ही त्यात लिंबू किंवा मध टाकूनही ते पिऊ शकता. यातून तुम्हाला अनेक फायदे मिळतात.