चांगल्यावाईट सवयींचा परिणाम व्यक्तीच्या जीवनशैलीवर होत असतो. तज्ज्ञांच्या मते काही वाईट सवयी व्यक्तीच्या शरीरावर आणि वयावरही परिणाम करतात.
अनेक व्यक्तींना बसल्या जागीच बोटं मोडण्याची सवय असते. पण ही सवय अतिशय वाईट.
वारंवार बोटं किंवा हाडं वाजवल्यानं सांध्यांमध्ये असणाऱ्या पेशींना नुकसान पोहोचतं, त्या कमकुवत होतात.
हाडं, बोटं वाजवल्यामुळं सांध्यांचे विकार जडण्याची भीती असते. याशिवाय आर्थरायटिसचा धोकाही वाढतो.
लहान मुलांना बोटं वाजवायची सवय असल्यास त्यांच्या नाजूक हाडांचं यामुळं नुकसान होऊन बोटं वाकडी होण्याची भीती असते.
हाडांना बळकटी देण्यासाठी रोज दूध पिणं फायद्याचं मानलं जातं. (वरील माहिती सामान्य संदर्भावर आधारित असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)