मेनोपॉज म्हणजे महिलांची अशी शारीरिक स्थिती ज्यामध्ये त्यांची मासिक पाळी बंद होते.
या स्थितीमध्ये महिलांच्या अंडाशयाची सक्रियता कमी होऊन ते काम करणं बंद करतं आणि नैसर्गिक गर्भधारणा शक्य होत नाही.
IVF सारख्या तंत्रज्ञानामुळे मात्र काही प्रकरणांमध्ये गर्भधारणा शक्य असते. डोनर एगचा वापर करून हे शक्य होतं.
महिलांना अनेकदा 45 ते 55 वर्षांदरम्यान मेनोपॉजचा सामना करावा लागतो.
मेनोपॉजमध्ये महिलांच्या शरीरात अनेक हार्मोनल बदल होतात. मेनोपॉजचा सामना करणाऱ्या महिलांनी गर्भधारणेची इच्छा असल्यास तज्ज्ञ, डॉक्टरांशी संपर्क साधल्यास यामध्ये त्यांची सहज मदत मिळते.