तरुण वयात केस पांढरे होत आहेत? 'या' घरगुती उपायाने मिळवा नैसर्गिक काळे, घनदाट केस

Intern
Apr 26,2025


सध्याच्या चुकीच्या जीवनशैली आणि आहारशैलीमुळे कमी वयातच अनेक समस्या उद्भवतात.


यामध्ये सर्वात मोठी समस्या म्हणजे लहान वयात केस पांढरे होणे किंवा गळणे.


आज आपण अशा एका घरगुती उपायाबद्दल जाणून घेणार आहोत. ज्यामुळे तुमचे केस रेशमी, चमकदार आणि काळे होऊ शकतात.


या उपायासाठी तुम्हाला फक्त खोबऱ्याचे तेल आणि आवळ्याची पावडर लागेल.


सर्वप्रथम आवळ्याची पावडर खोबऱ्याच्या तेलात भिजवून ठेवा आणि नंतर ते मिश्रण मंद आचेवर शिजवा. काही वेळात पावडर काळी होईल.


ही पेस्ट एका वाटीत काढून थंड होऊ द्या. रात्री झोपण्यापूर्वी ही पेस्ट संपुर्ण केसांना लावा.


सकाळी उठल्यावर केस थंड पाण्याने स्वच्छ धुवा.


आठवड्यातून दोन वेळा हा उपाय केल्यास केस लवकरच मऊ, कोमल, काळे आणि घनदाट होतात.

(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story