जॅकफ्रूट म्हणजे फणसाचे सेवन आरोग्यासाठीही खूप फायदेशीर मानले जाते. मात्र, काही लोकांसाठी फणस हानीकारक ठरु शकतो.
फणसामध्ये प्रथिने, फायबर, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, मॅग्नेशियम, तांबे, मॅगनीज, राइबोफ्लेविन अदी जीवनसत्वे मोठ्या प्रमाणात असतात.
मधुमेहाच्या रुग्णांसाठी फणसाचे सेवन हानिकारक ठरु शकते. शुगर वाढू शकते.
पचनाची समस्या असेल, तर चुकूनही फणसाचे सेवन करू नका. यामुळे उलट्या, पोटदुखी आणि अपचन होऊ शकते.
विशिष्ट प्रकारची एलर्जी असेल तर फणसाचे सेवन टाळावे.
मूत्रपिंडाचा त्रास होत असेल तर फणस खाणे टाळा.
गर्भवती महिलांनी फणसाचे सेवन टाळावे.
अनेकांना फणस खाल्ल्यावर त्वचेवर पुरळ उठण्याची समस्या उद्भवू शकते.