शॅम्पू नव्हे, जया किशोरी केस धुवायला वापरतात 'या' घरगुती गोष्टी, तुमच्याकडेही हमखास असेल

Pravin Dabholkar
Oct 22,2023


Jaya Kishori Hair Tips: प्रसिद्ध कथाकार, प्रेरक वक्ता आणि भजन गायिका जया किशोरी या देशभरात प्रसिद्ध आहेत. त्या आपल्या साध्या राहणीसाठी ओळखल्या जातात.


त्यांचे केसही तितकेच सुंदर आहेत. जया किशोरी यांच्यासारखे सुंदर, लांब, काळे आणि मजबूत केस असावेत, असे प्रत्येक तरुणीला वाटते.


यासाठी तुम्हाला महागडे शॅम्पू किंवा प्रोडक्ट वापरण्याची गरज नाही. तुम्ही काही घरगुती उपाय करुन केसांची लांबी वाढवू शकता.


काही घरगुती उपाय केल्यास त्यानंतर तुम्ही तुमचे केस शॅम्पूने धुण्यास विसराल. केस सुंदर करण्यासाठी कोणत्या टिप्स वापरायच्या? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.


जया किशोरी यांचे चाहते आणि प्रियजन तिच्या काळ्या, लांब आणि दाट केसांचे रहस्य जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. जया किशोरी नेहमीच नैसर्गिक पद्धतीने केसांची काळजी घेतात.


कोणत्याही प्रकारचे केमिकल केस केअर प्रोडक्ट वापरत नाहीत. आणि कोणतेही प्रोडक्ट वापरण्याचा सल्लादेखील त्या देत नाहीत.

कोरफड जेल

कोरफडीचा गर केसांसाठी खूप फायदेशीर मानला जातो. याच्या वापराने केस मऊ तर होतातच शिवाय चमकदारही होतात.

खोबरेल तेल

जर तुम्हाला जया किशोरी यांच्या काळ्या केसांचे रहस्य जाणून घ्यायचे असेल, तर खोबरेल तेलाचा वापर सुरू करा. यामुळे केस मॉइश्चरायझ होण्यासोबतच ते मजबूतही होतील.

ग्रीन टी

ग्रीन टी लांब केसांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. यामध्ये अँटिऑक्सिडेंटसारखे गुणधर्म आढळतात ज्यामुळे केसांची वाढ होण्यास मदत होते.


(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story