पहिल्यांदा हेअर कलर करताना 'या' 5 गोष्टी लक्षात ठेवा; नाही तर होऊ शकतं नुकसान

Intern
Mar 15,2025


आजकाल अनेक लोक केस आकर्षक आणि सुंदर दिसण्यासाठी वेगवेगळा हेअर कलर करतात.


पण जर तुम्ही पहिल्यांदा हेअर कलर करत असाल, तर काही गोष्टींची काळजी घेणं महत्त्वाचं आहे.

1. हेअर स्टायलिस्टसोबत चर्चा करा:

हेअर कलर करण्यापूर्वी आपल्या हेअर स्टायलिस्टशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.

2. केसांचे आरोग्य तपासा:

केसांचे आरोग्य योग्य असल्याशिवाय हेअर कलर करु नका. जर केस आधीच खराब असतील, तर त्यांना रंग लावणं टाळा.

3. योग्य रंग निवडा:

तुमच्या केसांचा रंग निवडताना काळजीपूर्वक विचार करा आणि तुमच्या त्वचेला साजेल असा रंग निवडा.

4. हेअर कलरनंतरची काळजी:

हेअर कलर केल्यानंतर शॅम्पू, कंडिशनर आणि हेअर मास्कची विशेष काळजी घ्या, यामुळे रंग टिकून राहतो आणि केसांना पोषण मिळतं.

5. केसांच्या मुळांपासून दूर रहा:

हेअर कलर करताना केसांच्या मुळांना रंग लावणे टाळा, कारण ते आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं.


यामुळे तुमच्या केसांचे नुकसान होण्याची शक्यता कमी होईल आणि तुम्ही सुरक्षितपणे केस रंगवू शकाल.


(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story