शिळ्या पोळ्यांपासून बनवा चमचमीत गुलाबजाम; सोपी रेसिपी पाहा

कधी कधी रात्रीच्या पोळ्या शिल्लक राहिल्या तर सकाळी काय करायचे असा प्रश्न पडतो. गृहिणींच्या या प्रश्नाचे उत्तर आम्ही घेऊन आलो आहोत.

शिळ्या चपातीपासून तुम्ही चमचमीत गुलाबजाम बनवू शकतात. अगदी कमी पदार्थ आणि झटपट हे गुलाबजाम होतात. पाहा याची रेसिपी

शिळ्या राहिलेल्या तीन ते चार पोळ्यांचे तुकडे करुन ते मिस्करमध्ये बारीक करुन घ्या

त्यानंतर 1 कप गरम दूध आणि अर्धा चमचा वेलची पूड घालून त्यात हे मिश्रण भिजत ठेवावे. आता यात 2 चमचे तूप व अर्धा चमचा बेकिंग पावडर व चिमूटभर मीठ घालायचे.

त्यानंतर या मिश्रणात 1.5 कप मिल्क पावडर टाकून हाताने चांगले एकजीव करुन पीठासारखे मळून घ्या

गोल किंवा अंडाकृती जसे तुम्हाला आवडतील त्या आकाराचे गोळे करुन घ्या. त्यानंतर ते तेलात तळून घ्यायचे आहेत.

तर एकीकडे साखरेचा पाक तयार करुन त्यात हे तळलेले गुलाबजाम मुरायला सोडून द्या.

VIEW ALL

Read Next Story