फ्रीजमध्ये ठेवून बटर गोठलंय? न वितळवता असा करा वापर

सुट्टीच्या दिवसात किंवा रोज सकाळी काही जण नाश्तासाठी ब्रेड बटर खाणं पसंत करतात. तसंच, पराठा किंवा इतर पदार्थांबरोबरही बटर लावून खातात.

बटर वितळू नये म्हणून ते फ्रिजरमध्ये ठेवलं जातं. त्यामुळं बटर कडक किंवा गोठलं जातं. अशावेळी गोठलेले बटर ब्रेडला लावल्यास ते नीट लावलं जात नाही

फ्रीजमधून लगेचच काढलेले बटर ब्रेडला लावायला कठिण जाते. ब्रेडच्या स्लाइसला बटर नीट लागलं जात नाही तसंच लवकर वितळतदेखील नाही

अशावेळी नाश्ताला सुरुवात करण्याआधीच फ्रीजमधून बटर काढून ठेवा. पण तर तुम्ही ते विसरलात तर या एका टिप्सचा वापर करा.

सगळ्यात आधी फ्रीजमधून बटर काढून एखा प्लेटमध्ये ठेवा. त्यानंतर तुम्हाला चहाच्या गाळणीची गरज पडेल

बटरवर चहाची गाळणी ठेवून सरळ घासा. अशापद्धतीने बटर किसले जाईल. त्यानंतर हे किसलेले बटर तुम्ही वापरु शकता.

त्याचबरोबर, जेव्हा बाजारातून तुम्ही बटर घेऊन येता तेव्हाच त्याचे क्यूब्स करुन ठेवा. या क्यूब्स ना टुथपिक लावून स्टोर करा. जेव्हा गरज पडेल तेव्हा टुथपिक घेऊन ब्रेडवर लावू शकता.

VIEW ALL

Read Next Story