भाजीत जास्तीचं मीठ पडलं? टेन्शन सोडा या ट्रिक वापरून बघा!

स्वयंपाक चविष्ठ होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे मीठ. योग्य प्रमाणात मीठ वापरल्यास जेवणाची गोडी वाढते.

Mansi kshirsagar
Sep 01,2023


मात्र, कधी कधी कामाच्या गडबडीत मीठाचा अंदाज चुकू शकतो व जेवणात मीठ जास्त पडते


मीठ जास्त पडलं की जेवणाची चवच बिघडते. अशावेळी या काही टिप्स वापरून तुम्ही या प्रसंगावर मात करु शकता.

बटाटा

भाजीत मीठ जास्त पडले असेल तर त्यात थोडे उकडलेले बटाटे टाका. बटाट्यात स्टार्च असल्यामुळं भाजीतील मीठ जलद शोषून घेतात.

बेसन

भाजी किंवा डाळ गरजेपेक्षा जास्त खारट झाली असेल तर भाजीत भाजलेले बेसन टाका किंवा भाजीत कणकेचे गोळे करुन टाकल्यासही भाजीतील मीठ कमी होईल.

ब्रेड

भाजी पुन्हा पुर्ववत करण्यासाठी तुम्ही ब्रेडचा वापरही करु शकता. भाजीत ब्रेड टाका त्यामुळं मीठ शोषून घेतले जाईल.

लिंबू

भाजीत मीठ जास्त झाल्यास लिंबाच्या मदतीने परिस्थिती हाताळू शकता. मीठ जास्त झाल्यास त्यात लगेचच लिंबाचा रस घाला. आंबटपणामुळं मिठाचे प्रमाण कमी होईल.

VIEW ALL

Read Next Story