मधुमेहाच्या रुग्णांसाठी साखरेचा चहा पिणं धोकादायक ठरु शकतं. त्यामुळं त्यांना गुळाचा चहा पिण्याचा सल्ला दिला जातो.
मात्र अनेकदा गुळाचा चहा बनवत असताना दूध फाटते आणि सगळा चहा खराब होतो. पण ही पद्धत वापरून तुम्ही गुळाचा चहा बनवू शकता
चहा पावडर एक कप दूध एक कप पाणी गरजेनुसार गुळ चहाचा मसाला आले, गवतीचहा
सुरुवातीला एका भांड्यात एक कप दूध उकळून घ्या. त्यानंतर चहाच्या भांड्यात एक कप पाणी घेऊन त्यात चहापूड, साखर आणि चहाचा मसाला टाका.
जर तुम्हाला आल्याचा चहा आवडत असेल तर त्यात थोडंस आलं किसून टाका त्यानंतर थोडासा गवती चहा
गुळाचा चहा करत असताना साखरेच्या चहासाठी वापरता तेवढीच चहापावडरचे प्रमाण घ्या. त्यानंतर गरजेनुसार चहामध्ये गुळ टाका
गॅस मोठा करुन पाण्याबरोबरच गुळ वितळवून घ्या. त्यानंतर चहाला नीट उकळी येऊ द्या. चहा तयार झाल्यावर गॅस बंद करुन घ्या
कोरा गुळाचा चहा उकळलेल्या दूधात टाका त्यानंतर एका चमच्याने नीट मिक्स करुन घ्या.
एक लक्षात घ्या की, उकळत्या चहात दूध टाकल्यास ते फाटते त्यामुळं आधी दूध उकळवून मग त्यात कोरा चहा टाका
10 गुळाचा चहा थंड झाल्यानंतर परत गरम करू नका नाहीतर तो फाटतो