डोसा बनवत असताना तो सतत तव्यावर चिटकतो किंवा डोसा बनवताना तुटतो, अशा वेळी आयत्यावेळी नाश्ता काय करावा असा प्रश्न पडतो.
डोसे नीट काढले गेले नाही की सगळा मूड बिघडतो. म्हणूनच डोश्याचे पीठ आंबवताना या काही टिप्स वापरा. तुम्हालाही साउथ इंडियन स्टाइल डोसा बनवायचा असेल तर या गोष्टी ध्यानात ठेवा
तांदूळ २ कप, उडीद डाळ- 1/2 कप, चण्याची डाळ- २ कप, पोहे- 1/4 कप, मेथी दाणे- 1 चमचा, मीठ गरजेनुसार
तांदूळ घेताना तुम्ही ज्या कपाचे माप घेतले आहे त्याच कपाचे माप घेऊन अर्धा कप डाळ घ्या.
त्यानंतर एका मोठ्या भांड्यात डाळ, तांदुळ, मेथी दाणे टाकून हाताने 3 ते 4 वेळा धुवून घ्या. त्यानंतर 4-5 तासांसाठी पाण्यात भिजवून ठेवा. त्यानंतर या मिश्रणातून पाणी काढून घ्यावे.
आता एका मिक्सरमध्ये डाळ आणि तांदुळ याचे मिश्रण टाकून बारीक वाटून घ्या. त्याचदरम्यान त्यात थोडे पोहेदेखील टाका.
डाळ-तांदळाचे मिश्रण वाटून घेताना त्यात थोडे थोडे पाणी टाकत जा. मिश्रण व्यवस्थित बारीक वाटून घेतल्यानंतर एका भांड्यात काढून घ्या.
आता या बॅटरमध्ये चवीनुसार मीठ टाका. असं केल्याने डोश्याचे पीठ हळहळू आंबण्यास सुरुवात होईल
डोशाचे पीठ ठेवलेले भांडे किचनमधील एखाद्या गरम ठिकाणी ठेवा जेणेकरुन ते छान फुलुन येईल.
8 ते 9 तासांनंतर डोशाचे पीठ एकदा तपासा. डोशाचे पीठ छान फुलले असेल. एक लक्षात घ्या की डोसा बनवण्याच्या 5 मिनिटे आधी यात मीठ टाका