अद्रकचा वापर आपण जेवणात आणि चहा बनवण्यासाठी नेहमीच करतो. पण तुम्हाला माहित आहे का अद्रकचे सेवन केल्याने शरीरातील बॅड कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करते.
शरीरात बॅड कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढल्याने हृदयाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवणं गरजेचे असते.
अद्रकचे सेवन केल्याने शरीरात चांगले कॉलेस्ट्रॉल वाढण्यास मदत होते त्याचबरोबर ट्राइग्लिसराइड्स कमी करून रक्तातील लिपिड प्रोफाइल सुधारते.
अद्रकमध्ये असलेले जिंजरॉल आणि शोगाओल खराब कॉलेस्ट्रॉल कमी करतात. यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.
कॉलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी कच्चे आले सेवन केल्यास फायदेशीर ठरते.
त्याचबरोबर आल्याचा चहा आणि आल्याचे लाडू शरीरासाठी फायदेशीर आहेत. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)