लाल पेरू खाणे किती फायद्याचे?

गोड-तुरट चवीचा पेरू तुम्ही आवडीने खात असाल. पोटासाठी पेरू हे गुणकारी तर आहेच पण यात अनेक पोषक तत्व आहेत.

तुम्ही पाहिले असेलच की बाजारात दोन प्रकारचे पेरू मिळतात एक पांढरा तर एक लाल रंगाचा. या दोघांपैकी कोणता पेरू आरोग्यासाठी फायदेशीर आहे? जाणून घेऊया.

पेरूमध्ये अँटीमाइक्रोबियल, अँटीफंगल, व्हिटॅमिन सी, के, बी6, फोलेट, नियासिन, अँटीडायबेटिक, अतिसारविरोधी, लोह, फॉस्फरस, कॅल्शियम, पोटॅशियम, जस्त, तांबे, कार्बोहायड्रेट, आहारातील फायबर इत्यादी पोषक तत्व असतात.

लाल पेरूमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. त्याचबरोबर साखर आणि स्टार्च कमी असते.

लाल पेरूमध्ये क जीवनसत्व आणि बिया कमी असतात. त्यातुलनेत सफेद पेरूमध्ये सारख, स्टार्च आणि अधिक बिया असतात.

लाल पेरूमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्मदेखील असतात. लाल पेरू मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे. पेरूमुळं शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते

लाल पेरू खाल्ल्याने शरीरातील लोहाची कमतरता दूर होते. लाल पेरुमध्ये फायबर पुरेशा प्रणाणात असते.

लाल पेरू खाल्लयाने रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. तसंच, कर्करोगाचा धोकाही कमी होतो.

VIEW ALL

Read Next Story