नक्की काय होतं?

याला नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज म्हणतात. या रोगामध्ये मद्याचे सेवन न करताही यकृताभोवती चरबी जमा होत आहे.

काय आहे नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज?

या रोगात, यकृताभोवती चरबी जमा होऊ लागते. ज्याची कारणे म्हणजे लठ्ठपणा, इन्सुलिन रेझिस्टन्स, मेटाबॉलिक सिंड्रोम.

यकृत खराब होण्याचा धोका

फॅटी लिव्हरवर वेळेवर उपचार न केल्यास, जळजळ आणि यकृत खराब होण्याचा धोका असतो. अंदाजे 15-20 टक्के यकृत प्रत्यारोपण हे फॅटी लिव्हरमुळे होत आहेत.

कशामुळे होते असे?

याचे कारण चुकीचे खाणे आणि जीवनशैली आहे. आकडेवारीनुसार, हे यकृत खराब होण्याचे सर्वात मोठे कारण आहे.

लठ्ठपणा ठरू शकतो धोकादायक

जास्त लठ्ठपणा किंवा फक्त पोटाभोवती चरबी असणे फॅटी लिव्हरचा धोका वाढवते.

या आजारांमुळेही फॅटी लिव्हरचा धोका

पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम म्हणजेच PCOS, हायपोथायरॉईडीझम आणि विल्सन रोगामध्ये यकृतामध्ये चरबी जमा होण्याचा धोका असतो.

फॅटी लिव्हरपासून असे करा स्वतःचे संरक्षण

जर शरीरात या रोगाचे अगदी थोडेसे संकेत दिसत असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. सकस आणि पौष्टिक पदार्थ खा. जेणेकरून यकृताभोवती चरबी जमा होणार नाही.

फॅटी लिव्हरची लक्षणे

फॅटी लिव्हरमध्ये ओटीपोटात वेदना होतात. पोटाच्या वरच्या भागात जडपणा जाणवतो. पोट फुगल्यासारखे वाटते. मळमळ, उलट्या, भूक न लागणे ही फॅटी लिव्हरची सामान्य लक्षणे आहेत. (सर्व फोटो - freepik.com)

VIEW ALL

Read Next Story