Mayonnaise side effects : सँडविच, फ्राईज किंवा सॅलडसोबत मेयोनीज खाताय? याचा अर्थ तुम्ही तेल पित आहात
प्रमाणाबाहेर मेयोनीज खाणं आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. हा पदार्थ चवीला कितीही चांगला असला तरीही त्याचे आरोग्यावर होणारे परिणाम मात्र फारसे चांगले नाहीत.
मेयोनीज बनवण्यासाठी त्यामध्ये प्रामुख्यानं अंड, तेल आणि व्हिनेगर मिसळलं जातं. यामध्ये 80 टक्के भाग वनस्पती तेलाचा असतो. म्हणजेच मेयोनीजमध्ये 80 टक्के फॅट्सच असतात.
मेयोनीजमध्ये एकूण पॉली अनसॅच्युरेटेड फॅट्स आणि मोनो सॅच्युरेटेडसोबतच ट्रान्स फॅट्सही असतात. यामध्ये सहसा अॅपल सायडर व्हिनेगर आणि अंड्याच्या पिवळ्या भागाचा किंवा लिंबाच्या रसाचाही वापर केला जातो.
फॅट्स आणि कॅलरीच्या बाबतीत सांगावं तर, मेयोनीजमुळं स्थुलता वाढते आणि हृदयाच्या आरोग्यालाही त्याचा फारसा फायदा होत नाही.
साधारण 100 ग्रॅम मेयोनीजमध्ये 700 कॅलरी असतात. त्यामुळं तुम्ही एका वेळी 100 ग्रॅम मेयोनीज खाल्ल्यास 700 कॅलरी तुमच्या शरीरात साठतात. एक चमचा मेयोनीजमध्ये 90 ते 100 कॅलरी आणि 10 ग्रॅम फॅट्स असतात.
थोडक्यात दिवसाला एखादी व्यक्ती एक चमचा मेयोनीज खात असेल तर ती व्यक्ती शरीरात दर दिवशी पाच ग्रॅम कोलेस्ट्रॉलची भर टाकत आहेत.
इथून पुढं तुमच्यापुढं कोणी मेयोनीज आणलं तर, ते आवडतंय म्हणून प्रमाणापेक्षा जास्त खाणं किंवा सहजही खाणं टाळा आणि आरोग्यदायी जीवनाच्या दिशेनं एक पाऊल पुढे जा.