मासिक पाळीदरम्यान सर्वच महिला करतात 'या' 6 चुका; Painfree Periods साठी हे कराच

अधिक त्रास होतो अशा चुका

मासिक पाळीदरम्यान जवळपास सर्वच महिला काही अशा चुका करतात की ज्यामुळे त्यांचा त्रास वाढतो किंवा भविष्यात आरोग्यासंदर्भातील गंभीर समस्या निर्माण होतात.

काही गोष्टींची काळजी घेण्याचा सल्ला

त्यामुळेच स्रीरोगतज्ज्ञ महिलांना मासिक पाळीच्या दिवसामध्ये काही गोष्टींची काळजी घेण्याचा सल्ला आवर्जून देतात.

आहाराकडे विशेष लक्ष

मासिक पाळीच्या काळात महिलांनी त्यांच्या आहाराकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. या काळात पौष्टीक आहार आणि आवश्यक जीवनसत्त्वं मिळावित असा आहार घ्यावा.

पॅड बदला नाहीतर इन्फेक्शनचा धोका

अनेकदा रक्तस्राव कमी असेल तर महिला सॅनिटरी पॅड बदलत नाही. यामुळे इन्फेक्शनचा धोका संभावतो. म्हणूनच ठराविक वेळेनंतर पॅड्स बदलले पाहिजेत.

गोड पदार्थ खाण्याची इच्छा टाळा

सामान्यपणे मासिक पाळीदरम्यान महिलांना गोड पदार्थ खाण्याची इच्छा होते. मात्र स्वत:वर नियंत्रण ठेवणं फायद्याचं ठरतं कारण गोड पदार्थांमुळे अॅसिडीटी होण्याची शक्यता असते.

व्यायाम करणं टाळा

मासिक पाळीच्या काळात व्यायाम करणं टाळा आणि जड वस्तू उचलू नका.

शरीरसंबंध ठेऊ नका

मासिक पाळीच्या काळात शरीरसंबंध ठेऊ नका. कारण यामुळे इन्फेक्शनचा धोका निर्माण होतो.

स्वच्छतेची काळजी घ्या

मासिक पाळीच्या काळात वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घ्या. दररोज अंघोळ करा. गुप्तांगाजवळचा शरीराचा भाग व्यवस्थित स्वच्छ करा.

डॉक्टरांचा सल्ला घ्या

(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

VIEW ALL

Read Next Story