लहान असो वा मोठे, दूध सर्वांसाठीच फायदेशीर असते. दूधाला 'कंप्लीट फूड' म्हणजेच परिपूर्ण आहार मानले जाते.
दूधामध्ये प्रथिने, कॅल्शियम, फॉस्फरस आणि पोटॅशियमसारखी अनेक पोषकतत्त्वे असतात.
पण तुम्हाला माहित आहे का, गरम दूधात फक्त एक पदार्थ मिसळल्यास त्याचे फायदे दुपटीने वाढतात? हा पदार्थ म्हणजे गुळ.
जाणून घेऊयात दूधात गुळ घालून प्यायल्याने कोणते आरोग्य फायदे होतात.
गुळामध्ये भरपूर प्रमाणात लोह असते. जे शरीरातील रक्तवाढीसाठी उपयोगी ठरते.
गुळात कॅल्शियम आणि फॉस्फरस असल्यामुळे हाडेही बळकट होतात.
गुळाचे दूध पचनासाठी खूप फायदेशीर मानले जाते. विशेष म्हणजे अपचन किंवा गॅसच्या त्रासावर उपयुक्त असते.
गुळामध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असल्यामुळे गुळाचे दूध हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरते.
गुळात असलेले प्रथिने आणि गुड फॅट्स शरीराला ऊर्जा मिळवून देतात. तसेच थकवा दूर करतात.
दररोज रात्री झोपण्यापूर्वी एक कप गरम गुळाचे दूध प्यायल्यास शरीरातील अनेक त्रास दूर होण्यास मदत होते.