वजन कमी करायचं असेल तर केवळ चार सोप्या गोष्टी तुम्हाला फॉलो कराव्या लागतील, त्या कोणत्या पाहूयात...
वजन कमी करणं हे अनेकदा महत्त्वाचं वाटत असलं तरी त्यासाठी अनेकांची इच्छाशक्ती कमी पडते आणि पोटाचा घेर दिवसोंदिवस वाढत राहतो.
मात्र रोज सकाळचं एक ठराविक रुटीन नीट सेट करुन घेतलं तरी व्यायाम न करताच वजन कमी करता येईल असं सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण हे कसं शक्य आहे पाहूयात...
सकाळी झोपेतून लवकर उठणे ही चांगली गोष्ट असली तरी तुमची झोप पूर्ण झाली पाहिजे याची काळजी घ्या. त्यामुळे झोपेतून लवकर उठण्यासाठी रात्री लवकर झोपणं गरजेचं आहे.
रात्री उशीरा झोपून सकाळी लवकर उठत असाल तर वजन कमी करण्याच्या तुमच्या प्रयत्नांना फारसं यश येणार नाही.
वजन कमी होण्याऐवजी कमी झोपेमुळे वजन वाढू शकतं. त्यामुळे सर्वात आधी पुरेश्या झोपेनुसार रुटीन सेट करावं.
सकाळी झोपेतून उठल्यानंतर काहीही खाण्याआधी किंवा चहा, कॉफी घेण्याआधी कोमट पाणी प्यावं. कोमट पाणी शरीरामधील चरबी कमी करण्यासाठी मदत करत.
साधं कोमट पाणी पिण्याऐवजी तुम्ही ओवा टाकलेलं पाणी, मध आणि लिंबाचं पाणी किंवा जीऱ्याचं पाणी पिऊन दिवसाची सुरुवात करु शकता.
सकाळचा नाश्ता असा असला पाहिजे की तुमचं पोट भरलं पाहिजे. दुपारपर्यंत शरीरामध्ये ऊर्जा टिकून राहावी असे पदार्थ नाश्त्याला खाणं वजन कमी करण्यासाठी फायद्याचं ठरतं.
त्यामुळेच प्रोटीन आणि फायबर असलेला नाश्ता खावा. यामध्ये अंडी, पोहे, उपमा, ओट्स, पराठा, फ्रूट सॅलेड यासारख्या गोष्टींना प्राधान्य द्यावं.
दिवसभरामध्ये कधीही काहीही खाल्ल्यानंतर 20 मिनिटांनी कोमट पाणी प्यावे. भरपूर खाल्ल्यानंतर 20 मिनिटं चालावं.
वजन कमी करण्यासाठी कोमट पाणी आणि चालणे या दोन्ही गोष्टी फायद्याच्या ठरतात.
शक्य असेल तर सायंकाळी किमान एक तास चालवे. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही. आरोग्यासंदर्भातील समस्यांसाठी फॅमेली डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.