Mosquito Bites : मच्छर चावताच शरीराचा तो भाग का सुजतो? जाणून घ्या!

वातावरण कसंही असून मच्छर हे चावून आपल्याला त्रास देतातच

डास चावल्यावर खाज येण्याव्यतिरिक्त त्वचेवर सूज येते. डास चावल्यावर असे का होते याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?

डास आपलं रक्त पितात

मानवी रक्तातील पोषक घटक मादी डासांना पुनरुत्पादनासाठी आवश्यक अंडी तयार करण्यास मदत करतात.

जेव्हा डास चावतात तेव्हा आपले संरक्षण करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती सक्रिय होते. यामुळे आपल्या त्वचेला मच्छर जिथे चावते त्या ठिकाणी सूज येते.

त्वचा आपल्या शरीराचं बॅक्टेरिया किंवा कोणत्याही बाह्य धोक्यापासून संरक्षण करण्याचे कार्य करते.

जेव्हा एखादा डास चावतो तेव्हा आपली रोगप्रतिकारक शक्ती त्वचेला ब्रेक करतं. जेव्हा डास चावतो तेव्हा त्याची लाळ आपल्या शरीरात पोहोचते.

यावेळी ही लाळ शरीरातील बाहेरील पदार्थ समजून इम्यून सिस्टम एक्टिव होते.

जेव्हा एखादा डास आपल्याला चावतो तेव्हा रोगप्रतिकारक शक्ती चाव्याच्या ठिकाणी विशिष्ट प्रकारचे रासायनिक हिस्टामाइन पाठवते.

हिस्टामाइन डास चावण्याच्या ठिकाणी रक्त प्रवाह आणि पांढऱ्या रक्त पेशी वाढवते. या कारणामुळे त्या भागावर खाज येते आणि आपली त्वचा फुगते

VIEW ALL

Read Next Story