पावसाळा आला की चहा आणि गरमागरम पदार्थ खाण्याचा आनंद हा वेगळाच असतो.
बटाटे, कांदा, पालक आणि पनीरपासून बनवलेली भजी पावसाळ्यात चहा किंवा हिरव्या चटणी सोबत खाण्याची चव वेगळीच असते.
बटाटे, वटाणे आणि अनेक मसाले टाकून गरमागरम समोस्याची चव पावसात दुप्पट चांगली लागते.
भाजलेला मका हा पावसाळ्यात लिंबू, मीठ लावून अप्रतिम लागत किंवा उकडलेल्या मक्याची भेळ खाल्ल्याने चव आणखी वाढते.
मूग डाळ, बटाटे किंवा वाटाणा घालून केलेली कचोरी आणि त्यासोबत चिंचेची चटणी पावसाळ्यात खाण्याचा आनंदच वेगळा असतो.
मुंबईचा लोकप्रिय वडापाव पावसाळ्यातही खुप आवडतो.
चणा चाट, पापड चाट, आलू टिक्की यांसारखे चाट पावसाळ्यात खाण्याचा आनंद वाढतो.