दूधात साखर मिसळून पिण्याची सवय असेल तर वेळीच सावध व्हा...

तुम्हालाही दुधाबरोबरच इतरही अनेक गोष्टींमध्ये वरुन साखर टाकून खाण्याची सवय असेल तर ही याची पाहाच...

अतिरिक्त साखरेची सवय

आपल्यापैकी अनेकांना एखाद्या गोष्टीवर अतिरिक्त साखर घेऊन खाण्याची सवय असते.

साखर टाकून खाण्याची आवड

अनेकांना अशाप्रकारे वरुन साखर पेरुन खाल्लेले पदार्थ आवडतात. यामध्ये गोड खाण्याची सवय किंवा इतर काही कारणं असू शकतात.

काही गोष्टींवर साखर टाकून खाणं धोकादायक

मात्र काही अशा गोष्टी आहेत ज्यांच्यावर अशाप्रकारे वरुन साखर टाकून खाणं प्रकृतीसाठी धोकादायक ठरु शकतं.

किती साखर खावी एका दिवसात?

एका व्यक्तीने एका दिवसात 6 ते 9 टीस्पून साखर खायला हवी असं अमेरिकन हार्ट असोसिएशनचं म्हणणं आहे.

थेट साखर टाळा

त्यामुळेच थेट साखर खाण्याचं प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न करणं आरोग्यसाठी फायद्याचं ठरतं.

वेळीच सावध व्हा

तुम्हीपण वेगवेगळ्या पदार्थांवर साखर घालून काही पदार्थ खाण्याची चूक करत असाल तर वेळीच सावध व्हा. हे पदार्थ कोणते ते पाहूयात...

फळांमध्ये असते साखर

फळांमध्ये नैसर्गिक गोडवा म्हणजेच साखर असते. अनेक लोक फळांच्या रसामध्ये साखर मिसळतात.

फळांच्या रसामध्ये साखर टाकली तर..

त्यामुळे अशा साखर मिसळलेल्या फळांच्या माध्यमातून साखरेचं शरीरामधील प्रमाण वाढू शकतं.

कॉफीत साखरेची सवय

बरेच लोक कॉफीमध्ये साखर मिसळून पितात. अनेकांना नुसती कॉफी फारच कडू लागते म्हणून ते त्यामध्ये साखर घालतात.

साखर न टाकताच कॉफी पिण्याची सवय लावा

मात्र कॉफीचा शरीराला फायदा व्हावा असं वाटत असेल तर साखर न टाकताच कॉफी पिण्याची सवय लावून घ्या.

फ्रूट डेझर्टमध्ये साखर नको

फ्रूट डेझर्ट तुम्हाला आवडत असेल तर त्यामध्ये वरुन अतिरिक्त साखर टाकणं टाळा.

फ्रूट डेझर्टवर साखर टाकू नका

फळांमध्ये नैसर्गिक गोडवा असतो. त्यात वरुन साखर टाकल्याने फ्रूट डेझर्ट फारच गोड होतं.

सीरियल्समध्येही असते साखर

ब्रेफास्टमध्ये खाल्ल्या जाणाऱ्या सीरियल्समध्ये साखर आधीपासूनच मिसळेली असते.

रक्तामधील साखर वाढण्याची शक्यता

या सीरियल्समध्ये वरुन अतिरिक्त साखर टाकून खाल्ल्यास रक्तामधील साखर वाढण्याची शक्यता असते.

दूधात साखर टाळा

बरेच लोक दुधामध्ये साखर मिसळून पितात. हे आरोग्यासाठी फारच धोकादायक असतं.

साखर न घालताच दूध प्यायल्यास

साखर न घालताच दूध प्यायल्याने दुधामधील सर्व पोषक तत्व शरीराला मिळतात.

साखरेवर नियंत्रण आवश्यक

यापुढे आधी नमूद केलेल्या गोष्टींमध्ये साखर टाकणं टाळल्यास तुमच्या आरोग्याला नक्कीच फायदा होईल. (सदर माहिती सामान्य ज्ञानावर आधारित असून ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story