Kalonji

Kalonji Use and Benefits : मसाल्याच्या डब्यातला 'हा' दुर्लक्षित घटक तुम्हाला ठेवणार निरोगी, फायदे पाहून लगेच सेवन कराल

कलौंजी

हा घटक म्हणजे कलौंजी किंवा मंगरेला. शास्त्रीय भाषेत त्याचा उल्लेख Nigella Sativa म्हणूनही केला जातो. पाहिल्यासारखा वाटतोय ना, हा पदार्थ?

लहानशी पुडी

घरातील मसाल्याचा डबा किंवा ठेवणीतच्या गरम मसाल्यांमध्ये कलौंजीची एखादी लहानशी पुडी तुम्हाला नक्कीच नजरेस पडेल. पूरी म्हणू नका किंवा लोणचं आणि पापड. कलौंजीचा वापर हमखास केला जातो.

फायदे

उत्तर भारतामध्ये सर्वाधिक वापरली जाणारी ही कलौंजी मराठमोळ्या घरांमध्ये तुलनेनं कमी वापरात येते. पण, तिचे फायदे पाहून आता तुम्हीही कलौंजी वापरायला सुरुवात कराल.

अँटीबॅक्टिरियल

अँटीबॅक्टिरियल, अँटीफंगल आणि अँटी पॅरासाईट गुणधर्मांमुळं कलौंजी त्वचाविकारांमध्ये गुणकारी ठरते. चेहऱ्यांवरील मुरुमं दूर करण्यात तिची मदत होते.

अँटी इन्फ्लेमेटरी गुण

कलौंजीमध्ये असणारे अँटीऑक्सिडंट आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुण वजन कमी करण्यात आणि ते नियंत्रणात ठेवण्यात फायद्याचे ठरतात. थायरॉईडच्या रुग्णांना याचं सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.

कलौंजी खाण्याचा सल्ला

कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जास्त असणाऱ्यांनाही कलौंजी खाण्याचा सल्ला दिला जातो. यामध्ये असणाऱ्या पॉलिअनसॅच्युरेटेड फॅट्समुळं कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत होते. इतकंच काय तर कलौंजीच्या तेलामुळं मधुमेहसुद्धा अटोक्यात येतो.

गुणधर्म

कलौंजीमध्ये असणारे गुणधर्म आणि रोगप्रतिकारक शक्ती पाहता आहारात तिचा समावेश केल्यास अनेक व्याधींना दूर ठेवणं सहज शक्य होतं.

VIEW ALL

Read Next Story