थंडीच्या दिवसात आरोग्याची काळजी घेण्यासाठी आहारात थोडे बदल करणे गरजेचं आहे

हिवाळ्यात उष्ण पदार्थ खाणं शरीरासाठी महत्वाचं मानलं जातं.

अश्याच एका झटपट तयार होणाऱ्या पदार्थाची आपण रेसिपी बघणार आहोत.

थंडीच्या दिवसात रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी ड्रायफ्रूट्सच्या लाडूची सोपी रेसिपी पाहूया

साहित्य

काजू बदाम पिस्ता प्रत्येकी एक वाटी , खजूर , शेंगदाणे एक एक वाटी

सुर्यफुलाच्या बीया , भोपळ्याच्या बीया, तीळ - १ वाटी ,फ्लेक्सिड्स- अर्धी वाटी ,कलिंगडाच्या बीया- अर्धी वाटी

लाडू करण्यासाठी एका कढईत साजूक तूप घालून घ्या.त्यात बदामाचे काप भोपळ्याच्या बीया, तीळ, कलिंगडाच्या बीया, सुर्यफुलाच्या बीया तळून घ्या, नंतर त्यात काजूचे काप, पिस्त्याचे घालूनही व्यवस्थित भाजून घ्या.

एका मिक्सर जारमध्ये खजूराचे तुकडे घालून खजूर बारीक करून घ्या.

कढईत तूप घालून त्यात बारीक केलेले खजूराचे मिश्रण घाला. खजूरात व्यवस्थित गरम करून घेतला की त्यात ड्रायफ्रुट्स आणि बियाचे मिश्रण घाला.

हे मिश्रण एकजीव करून घ्या नंतर गॅस बंद करा. गॅस बंद केल्यानंतर थोडं गरम असतानाच या मिश्रणाचे लाडू वळून घ्या. तयार आहेत ड्रायफ्रुट्सचे लाडू

VIEW ALL

Read Next Story