आपल्या शरीरात चांगल आणि वाईट दोन्ही कोलेस्ट्रॉल असतात. खराब कोलेस्ट्रॉल वाढल्यास हृदयविकाराचा त्रास होण्याची शक्यता बळावते. अशातच Bad Cholesterol वाढल्यास शरीरात काही लक्षणं दिसतात.
शरीरात खराब कोलेस्ट्रॉल वाढल्यास रक्त प्रवाह मंदावतो आणि त्यामुळे आपल्याला त्रास होतो.
शरीराच्या काही भागात रक्त पुरवठा किंवा दाब कमी झाल्यास वेदना होतात. या वेदना स्पष्ट संकेत देतात की, तुमच्या शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढले आहे.
छातीत वेदना आणि जडपणा पुन्हा पुन्हा जाणवणे म्हणजे उच्च कोलेस्ट्रॉलच लक्षण आहे.
थोडं चालल्यानंतरही श्वास घेण्यास त्रास होणं, चालताना छातीत किंवा पाठीत दुखणं हे वाढत्या कोलेस्ट्रॉलचे लक्षण आहे.
हाता-पायांमध्ये बधीरपणा आणि मुंग्या येणे.
खूप जास्त थकवा जाणवणे आणि शरीराच्या प्रत्येक भागात अधूनमधून वेदना होणे.
कोणतेही कारण नसताना डोके दुखी होणे.
यापैकी कोणतीही लक्षणं दिसल्यास त्वरित डॉक्टरांकडे जावे. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)