हल्ली आरोग्यदायी जीवनशैलीचा पर्याय निवडणाऱ्यांचा आकडा झपाट्यानं वाढताना दिसत असून त्यानुसार ही मंडळी काही कमाल बदल करताना दिसत आहेत.
आहाराच्या सवयी यामध्ये केंद्रस्थानी असून, शरीरास पोषक अशा पदार्थांच्या सेवनाला प्राधान्य दिलं जात आहे.
सुकामेवा... हा त्यातीलच एक घटक. शरीराला आवश्यक अशा स्निग्ध घटकांचा पुरवठा करणाऱ्या या सुकामेव्यामध्ये एक असा पदार्थ आहे जो बाहेरून बदामासारखा आणि आतून अक्रोडसारखा दिसतो.
आरोग्याच्या दृष्टीनं हा पदार्थ म्हणजे जणू संजीवनी. त्याचं नाव आहे पिकॅन नट. यामध्ये असणाऱ्या तंतुमय घटकांमुळं पचनक्रिया सुधारते.
पिकॅन नटमध्ये असणाऱ्या पोषक तत्वांमुळं अन्नचक्र सुधारतं. शरीरातील मेटाबॉलिझम सुधारतं.
वजन कमी करण्यास मदत करणारा हा सुकामेवा शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीमध्येसुद्धा वाढ करतो.
विटामीन A, E, झिंक आणि फॉलेट अशा घटकांमुळं या सुकामेव्याच्या सेवनानं त्वचेचं आरोग्य सुधारतं. (वरील माहिती सामान्य संदर्भांवर आधारित असून, झी 24 तास त्याची खातरजमा करत नाही)