भारतातील विविध भागात भेंडी वेगवेगळ्या पद्धतीने तयार केली जाते.
साऊथ इंडियन भेंडी मसाला हा एक खास पदार्थ आहे, ज्यामध्ये वेगळा तडका आणि नारळाची चव असते.
भेंडी, मोहरी, कढीपत्ता, मिर्ची, कांदा, टोमॅटो, लसून, गरम मसाला, सांबार मसाला, नारळ, मीठ, तेल
कढईत तेल गरम करा आणि त्यात कापलेली भेंडी सोनेरी रंगाची होईपर्यंत परतून घ्या आणि बाहेर काढा.
त्याच तेलात मोहरी, कढीपत्ता आणि मिरचीची फोडणी घाला.
आता त्यात चिरलेला कांदा, टोमॅटो, लसूण आणि सगळे मसाले घालून शिजवून घ्या.
शिजलेल्या मसाल्यात परतलेली भेंडी घालून एकजीव करा.
वरून किसलेले नारळ घालून 2 ते 3 मिनिटे शिजवून घ्या.
तुम्ही साऊश इंडियान स्टाईल भेंडी मसाला गरमागरम भात किंवा पोळीसोबत आनंदाने खाऊ शकता.