रामफळ हे अनेक गंभीर आजारांवर रामबाण उपाय आहे. मात्र, हाच रामबाण उपाय काही लोकांसाठी अत्यंत हानीकारक ठरु शकतो.
रामफळमध्ये कॉपर, मॅगनीज, फॉस्फोरस, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, आयर्न आणि झिंकसह अनेक प्रकारचे व्हिटामीन्स भरपूर प्रमाणात असतात.
रामफळात व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन बी असते. ज्यामुळे तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते.
विशिष्ट प्रकारच्या समस्या असणाऱ्यांनी रामफळाचे सेवन टाळावे.
सांधेदुखीपासून आराम मिळतो. त्वचेसाठी तसेच केसांसाठी रामफळ फायदेशीर आहे.
रामफळमध्ये शर्करेचे प्रमाण जास्त असते. यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी खाणे टाळावे.
लठ्ठपणाची समस्या असल्यास रामफळ खावू नये. यामुळे वजन वाढू शकते.
सर्दी, खोकला, ताप असल्यास रामफळ खाणे टाळावे असा सल्ला दिला जातो.