Blood Sugar अन् वजनही होईल कमी; रोज केवळ 'या' फळाच्या चूर्णाचं करा सेवन

हे फायदे वाचून तुम्हीही या फळाच्या चूर्णाचं सेवन करण्याचा नक्की विचार कराल

चवही आणि औषधही

जंभूळ हे फळ केवळ त्याच्या चवीसाठी नाही तर औषधी गुणधर्मांसाठीही ओळखलं जातं.

बियांचे फायदे वाचून व्हाल थक्क

मात्र जांभळाच्या बियाही औषधी असतात हे तुम्हाला ठाऊक आहे का? जांभळाच्या बियांचे फायदे वाचून नक्कीच तुम्ही थक्क व्हाल.

फळ आणि बी सुद्धा फायद्याची

जांभूळ आणि त्याच्या बियाही औषधी गुणांसाठी प्रसिद्ध आहे. जांभळाच्या बियांची पावडर ही आरोग्यासाठी फारच फायद्याची असते.

जांभळाच्या बिया सर्वोत्तम पर्याय

ब्लड शुगर म्हणजेच रक्तामधील साखरेचं प्रमाण कमी करायचं असेल तर जांभळाच्या बिया सर्वोत्तम पर्याय आहेत.

साखर रक्तात मिसळण्याच्या वेगावर नियंत्रण

जांभळाच्या बियांमध्ये जंम्बोलिन आणि जाम्बोसीन नावाचे तत्व असतात. या दोन्ही तत्वांमुळे साखर रक्तात मिसळण्याचा वेग कमी होतो.

नैसर्गिक इन्श्यूलिन

जांभळाच्या बियांमुळे शरीरामधील नैसर्गिक इन्श्यूलिनचं प्रमाणही वाढतं.

रसही फायद्याचा

जांभळाचा पल्प, रस आणि गर हा मधुमेह झालेल्या लोकांसाठी फायद्याचा ठरतो.

डिटॉक्सिफाइंग गुणधर्म

जांभळाच्या बिया डिटॉक्सिफाइंग औषधासारखं काम करतात. यामुळे शरीरामधून यूरीन आणि घाम बाहेर फेकण्याची प्रक्रिया सुरळीत राहण्यास मदत होते.

लिव्हरसाठी फायद्याचं

जांभूळ हे लिव्हरसाठी फायद्याचं असतं. जांभळामधील तत्वं लिव्हरमधील पेशांनी सुरक्षित ठेवण्यासाठी फायद्याची ठरतात.

लिव्हरची सूज कमी करण्यास मदत

जांभळांमध्ये अ‍ॅण्टी-इफ्लेमेट्री गुणधर्मही असतात. ज्यामुळे लिव्हरची सूज कमी करण्यास मदत होते.

रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत

जांभळाच्या बियांची पावडर एलाजिक अ‍ॅसिड नावचं अ‍ॅण्टीऑक्सिडंट असतं. यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.

पोटाचा घेर कमी करण्यास फायद्याची

जांभळाच्या बियाची पावडर वजन कमी करण्यासाठीही फायद्याची असते. रोज जांभळाच्या बियांची एक चमचा पावडर सेवन केल्याने पोटाचा घेर कमी होण्यास (बेली फॅट कमी होण्यास) मदत होते.

डॉक्टरांचा सल्ला घ्या

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही. यासंदर्भात डॉक्टरांचा सल्ला घ्यावा)

VIEW ALL

Read Next Story