लाल की हिरवा माठ?

लाल की हिरवा माठ? पाहा कोणती पालेभाजी आरोग्यासाठी फायद्याची

लाल आणि हिरवा माठ

सहसा माठाची भाजी घ्यायची झाली की त्यातही लाल आणि हिरवा असे दोन प्रकार आढळतात. त्यामुळं नेमकी कोणती भाजी घ्यायची हा प्रश्नही अनेकांना पडतो.

तंतुमय घटक

लाल माठामध्ये असणारे तंतुमय घटक वजन कमी करण्यासाठी फायद्याचे ठरतात. लाल माठात फायबरचं प्रमाण जास्त असल्यामुळं त्याचं सेवन कायम फायद्याचं.

रक्तातील इन्सुलिनची पातळी

लाल माठामध्ये असणारं प्रोटीन रक्तातील इन्सुलिनची पातळी नियंत्रणात ठेवतं. त्यामुळं त्याचं सेवन शरीराराठी फाद्याचं ठरतं.

लोहाचं प्रमाण

लाल माठामध्ये लोहाचं प्रमाणही जास्त असल्यामुळं रक्त शुद्धीकरणात त्याची मदत होते. त्यामुळं शक्य असेल तेव्हा लाल माठ खावा.

हिरवा माठ

हिरव्या माठातही लाल माठाप्रमाणंच गुणधर्म आढळून येतात. एक पालेभाजी असल्यामुळं हिरव्या माठामध्ये तंतूमय घटकही मुबलक प्रमाणात आढळतात.

हिरवा माठही फायद्याचा

लाल माठ की हिरवा माठ असे दोन पर्याय समोर असतील तर लाल माठाला प्राधान्य द्या. पण, हिरवा माठ खाऊच नका असंही नाही.

हाडांना बळकटी

हिरवा माठही तुमच्या शरीराला आवश्यक घटकांचा पुरवठा करण्यास मदत करतो. माठाच्या कोणत्याही भाजीच्या सेवनामुळं किडनीचं आरोग्य सुधारतं. शिवाय रक्तदाब नियंत्रणात राहून हाडं बळकट होतात.

VIEW ALL

Read Next Story