‘हा’ पांढरा मसाला तुपात भाजून खा, कोलेस्टेरॉलचा होईल नायनाट
सर्वांना माहिती आहे की, कोलेस्टेरॉल हे आपल्या आरोग्यासाठी खूप धोकादायक आहे.
हे कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी तुम्हाला घरगुती उपाय माहिती आहे का?
आज आम्ही तुम्हाला किचनमधील असा मसाल्याबद्दल सांगणार आहोत, जो कोलेस्ट्रॉल कमी करण्यास फायदेशीर मानला जातो.
लसून हा तुपात तळून खाल्ल्यास कोलेस्टेरॉल कमी करण्यात फायदेशीर आहे.
लसणामध्ये अँलिसिन नावाचं संयुग असतं, जे कोलेस्ट्रॉ काढून टाकण्यास मदतगार मानलं जातं.
लसूण हे एक उत्तम अँटिऑक्सिडेंट अन्न आहे, जे तुमचं शरीर स्वच्छ करतं.
लसूण आणि तूप यांचं निरोगी मिश्रण तुमची रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यास मदत करतं.
हृदयरोग्यांनी दररोज कोणत्या ना कोणत्या स्वरुपात लसूण सेवन करावे.
तुम्ही दररोज सकाळी लसणाच्या 3-4 पाकळ्या खाल्ल्या तर कोलेस्ट्रॉल लवकर निघून जाण्यास मदत होते.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)