पावसाळा सुरू झाला असून हवामानातही मोठा बदल झाला आहे.
सध्या अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे.
पावसाळ्यात बहुतेकांच्या मनात एक प्रश्न नक्कीच निर्माण होतो - आपण पावसाचे पाणी पिऊ शकतो का?
तर जाणून घेऊयात, पावसाचे पाणी पिणे योग्य आहे की नाही.
पावसाचे पाणी पिण्यास योग्य आहे की नाही, हे तुम्ही कशा प्रकारे साठवता यावर अवलंबून असते.
पावसाच्या पाण्यात असलेले जंतू आणि रसायने काढून न टाकल्यास ते पिण्यास सुरक्षित नसते.
त्यामुळे पावसाचे पाणी योग्य रीतीने साठवले गेले असेल किंवा नीट फिल्टर केले गेले असेल, तरचं ते पिणे योग्य आहे.
तुम्ही इच्छित असाल तर पावसाचे पाणी उकळूनही पिऊ शकता, जे अधिक सुरक्षित ठरते.