'या' लोकांनी हिरवे वाटाणे खाऊ नयेत?

Jan 07,2024

डायबिटीज

रक्तातील ग्लुकोजचं प्रमाण वाढल्याने रक्तातील साखरेचं संतुलन बिघडतं. मटारच्या अतिसेवनामुळेही तुमचा मधुमेह होऊ शकतो.

कोणत्याही प्रकारची जखम

हिरव्या वाटाणामध्ये 'व्हिटॅमिन के' देखील जास्त प्रमाणात असल्यामुळे जखम बरी होण्यास जास्त वेळ लागतो.

प्लेटलेट्स कमी असल्यास

शरीरातील प्लेटलेट्स कमी झाल्यामुळे व्यक्तीला अंतर्गत रक्तस्त्राव होण्याची भीती आहे. हिरव्या मटारमध्ये व्हिटॅमिन के जास्त प्रमाणात असल्यामुळे ते तुमचे प्लेटलेट्स कमी होऊ शकतात.

पोटाच्या समस्या

मटारमध्ये कार्बोहायड्रेट्स आणि फायबर चांगल्या प्रमाणात असल्यामुळे पोटाचा त्रास निर्माण होतो. त्याशिवाय तुम्हाला सूज येणे, बद्धकोष्ठता आणि गॅस सारख्या समस्या त्रासदायक ठरु शकतात.

वजन कंट्रोल

वजन कमी करत असाल तर हिरवे वाटाणे टाळा. हिरव्या वाटाण्यामुळे मधुमेह वाढू शकतो, त्याचप्रमाणे शरीरात कार्बोहायड्रेट, फायबर आणि प्रोटीनचं प्रमाण जास्त वाढल्यास वजन झपाट्याने वाढतं.

हाय यूरिक अॅसिड

या लोकांनी मटारचं सेवन करु नयेत. यात प्रोटीन, अमीनो अॅसिड, व्हिटॅमिन डी आणि फायबर भरपूर प्रमाणात असल्यामुळे शरीरात यूरिक अॅसिड वाढतं. मटरच्या अतिसेवनामुळे अर्थरायटिस किंवा गाउटची समस्या निर्माण होऊ शकते.

किती प्रमाणात मटार खावे?

कोणत्याही पदार्थाचं अती प्रमाणात सेवन हे हानिकारक असतं. आहार तज्ज्ञांनुसार दररोज 50 ग्रॅमपेक्षा जास्त मटर खाऊ नयेत. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story