साबुदाण्याची खिचडी खाऊन वैतागलात का? मग 'ही' उपवासाची मिसळ नक्की तरी करा..
श्रावण महिना सुरू झाला म्हटलं की अनेक सणांची लगबग सुरू होते. अशावेळी सहाजिकच उपवास करावा लागतो. पण उपवासाला तेच तेच साबुदाण्याची खिचडी करुन वैतागलात का? आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय एक मस्त रेसिपी
Mansi kshirsagar
Aug 23,2023
या श्रावण महिन्यात झणझणीत उपवासाची मिसळ करुन पाहा. उपवासाची मिसळ कशी करायची याची सोपी रेसिपी पाहा.
कृती - 1. सर्वप्रथम शेंगदाणे मीठ घालून उकडवून घ्या. त्यानंतर शेंगदाण्याची उसळ तयार करुन घ्या.
त्यानंतर साबुदाण्याची खिचडी आणि बटाट्याची भाजी करुन घ्या. हे सगळे पदार्थ तयार करुन झाले की एका प्लेटमध्ये किंवा वाटीत 1 चमचा बटाट्याची भाजी, खिचडी आणि मग दाण्याची उसळ असे सगळे काढावे.
प्लेटमध्ये हे सगळं काढल्यानंतर त्यावर लिंबू पिळावे. त्यावर बटाट्याचा चिवडा टाकावा. व सजावटीसाठी कोथिंबीर घालावी.
जर तुम्हाला झणझणीत मिसळ हवी असेल तर तुम्ही मिरचीचा ठेचादेखील वापरु शकता.