घाईत जेवण्याची सवय ठरु शकते अडचणीची, कसं ते समजून घ्या

आजकालच्या धावपळीच्या जीवनात आपण जेवणदेखील घाईघाईमध्ये करतो.पण तुम्हाला माहित आहे का याचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतो.

अनेकवेळा आपल्याला वडिलधाऱ्यांकडून हळू जेवण्याचा सल्ला दिला जातो. आयुर्वेदात देखील अन्न हळूहळू खाण्याचा सल्ला दिला जातो.

विज्ञानदेखील या गोष्टीवर विश्वास ठेवते. विज्ञानानुसार अन्न लवकर खाल्ल्याने अन्नासोबत हवादेखील शरीरात जाते. ज्यामुळे गॅस आणि ब्लोटिंगसारख्या समस्या उद्भवू शकतात.

वजन झपाट्याने वाढते

विज्ञानानुसार आपण जेवल्यानंतर मेंदू 20 मिनिटानंतर पोट भरल्याचा संदेश पाठवतो.जर तुम्ही लवकर जेवलात तर मेंदूला सिग्नल पाठवण्यात वेळ जातो, ज्यामुळे जास्त अन्नाचे सेवन केले जाते. त्यामुळे वजन वाढण्याची समस्या उद्भवते.

मधुमेह

एका अभ्यासात असे दिसून आले की, मंद खाणाऱ्यांपेक्षा जलद खाणाऱ्यांना मधुमेह होण्याची भीती अधिक असते.

इन्सुलिन रेझिस्टन्स

लवकर जेवल्याने रक्तातील साखरेची आणि इन्सुलिनची पातळी खालावते. ज्यामुळे मेटाबॉलिकची समस्या वाढून हृदयविकाराचा धोका देखील वाढतो.

पचनाशी संबंधित

ज्यावेळी आपण जलद खातो त्यावेळी आपण मोठे घास उचलतो. ते पचवण्यासाठी पचनसंस्थेला जड जाते. यामुळे अपचनाची समस्या होऊ शकते.

VIEW ALL

Read Next Story