युरिक अ‍ॅसिडमुळं सांधेदुखी बळावली?; घरातच आहे रामबाण उपाय

शरीरात युरिक अॅसिडचे प्रमाण वाढल्यास अनेक गंभीर आजारांचा धोका निर्माण होतो. युरिक अॅसिड असलेल्या पदार्थांमधून शरीरात जास्त प्रमाणात प्युरीन जमा होते.

युरीक अॅसिड लघवीद्वारे बाहेर पडत असते. परंतु असे न झाल्यास ते घन क्रिस्टल म्हणजेच दगडांच्या रुपात जमा होते. त्यामुळं सांधीवात आणि किडनी स्टोन सारख्या आजारांचा धोका निर्माण होतो.

शरिरातील युरिक अॅसिड कमी करण्यासाठी तुम्ही घरगुती उपायही करु शकता. काही फळांचा व भाज्यांचा वापर करुन तुम्ही युरीक अॅसिडची पातळी कमी करु शकता.

केळं

युरीक अॅसिड कमी करण्यासाठी केळ्याचे सेवन केले जाते. केळ्यात फायबरची मात्रा अधिक असते. केळ्यात प्युरिन नसते त्यामुळं युरिक अॅसिड कमी करण्यासाठी केळं खाऊ शकता.

लिंबू

लिंबात व्हिटॅमिन कची मात्रा अधिक आहे. लिंबात व्हिटॅमिन कबरोबरच साइट्रिक अॅसिडदेखील असते. लिंबू पाणी प्यायल्याने शरीरातील टॉक्सिस सगळे निघून जातात. लिंबू पाणी शरीरातील यूरिक अॅसिडदेखील बाहेर फेकते.

सफरचंद

सफरचंदमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर आढळते. सफरचंद खाल्ल्याने यूरिक अॅसिड कमी होते.

सीताफळ किंवा भोपळा

सीताफळ किंवा भोपळा आरोग्यासाठी फायदेशीर आहे. भोपळ्यात बीटा, कॅरोटिन, ल्युटिन आणि अँटी ऑक्सिडेंट्स असतात. या गुणधर्मामुळं युरिक अॅसिड कमी होते.

चेरी

अँटी ऑक्सिडेंट्स आणि अँटी इंफ्लेमेंटरी गुणधर्म चेरीमध्ये असतात. युरिक अॅसिड कमी करण्याबरोबरच युरिक अॅसिडमुळं होणाऱ्या सांधेदुखीदेखील कमी होते.

VIEW ALL

Read Next Story