साप बघितल्यावर अनेकांच्या अंगावर काटा उभा राहतो. काहींना घाम फुटतो.
काही लोक साप बघून पळून जातात तर काही बेशुद्धही पडतात.
पण सापाचे विष कोणत्या आजारांसाठी उपयोगी आहे, तुम्हाला माहिती आहे का?
सापाचे विष जितके घातक आहे तितके फायदेशीरदेखील आहे.
काही ठिकाणी सापांची शेती करुन लाखोंची कमाई केली जाते.
सापाच्या विषाने बनवलेले औषध हृदय रोगासाठी उपयोगी पडते.
उच्च रक्तदाबावर उपाय म्हणून देखील याचा वापर केला जातो.
हार्ट फेल समस्येसाठी देखील सापाच्या विषाने बनवलेले औषध उपयोगी येते.
जरराका पिट वायपर सापाच्या विषाने बनवलेले औषध खूप फायदेशीर ठरते.