पाणीपुरी, चाट, अति आंबट किंवा अती चमचमीत पदार्थ खाल्ल्यामुळं पचनसंस्थेवर याचा परिणाम होतो. ज्यामध्ये अॅसिडीटी, पोटदुखी, बेचैन वाटणं अशा समस्या जाणवू शकतात.
ज्यांना उच्च रक्तदाबाची समस्या आहे त्यांनी पाणीपुरी, चाट किंवा कोणताही आंबट आणि चटपटीत पदार्थ अती प्रमाणात खाऊ नये, अन्यथा ही समस्या आणखी बळावेल.
आंबट आणि चटपटीत पदार्थांच्या अती सेवनामुळं हृदयरोगांचा धोकाही वाढतो. त्यामुळं या पदार्थाचं सेवन प्रमाणशीर असणं फायद्याचं.
पाणीपुरीसारखे आंबटतिखट पदार्थ अती प्रमाणात खाल्ल्यामुळं किडनीवरील ताण वाढतो यामुळं या अवडवाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो.
आंबट पदार्थांच्या सेवनानंतर दातांवर त्याचा थेट परिणाम दिसून येतो. यादरम्यान दात पोकळ होण्याचीही शक्यता असते. त्यामुळं या पदार्थांचं सेवन प्रमाणात केलेलं बरं.