तुम्हीदेखील मधुमेहामुळं त्रस्त आहात आणि तुम्हाला ब्लड शुगर नियंत्रणात ठेवायची असेल तर शिळी चपाती खाणे तुमच्यासाठी फायदेशीर आहे.
पण कोणताही पदार्थ 15 तासांपेक्षा जास्त शिळा असेल तर तो खावू नये. त्यामुळं चपातीदेखील 12-15 तासांपेक्षा जास्त तास उलटून गेली असेल तर खावू नये
शिळ्या चपात्यांमध्ये व्हिटॅमिन बी, मॅग्निशियम, पोटॅशियम आणि कॅल्शियम असते. जे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
काही तज्ज्ञांच्या मते, शिळी चपाती खाल्ल्याने ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतो व पोटाच्या समस्यांवरही आराम मिळतो
शिळी चपाती खाण्याचा फायदा योग्य पद्धतीने खाल्ल्यावरच मिळतो. त्यामुळं शिळी चपाती दुधात 10 ते 15 मिनिटे भिजवत ठेवा
या शिळ्या चपातीमुळं पोषणदेखील मिळते आणि तुम्ही कधीही ही चपाती खावू शकता
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)