मानसिक आरोग्यासाठीही उत्तम आहेत टॅटू
काही सौंदर्यासाठी, काही आध्यात्मिक किंवा वैयक्तिक वाढीसाठी, तर काही भूतकाळातील आघात किंवा अनुभवातून बरे होण्यासाठी काढतात.
सध्याच्या ट्रेंडचे अनुसरण टॅटू काढले जातात. पण टॅटू केल्याने काही मानसिक आरोग्य फायदे होतात, असं तज्ज्ञ सांगतात.
शरीरावर एक टॅटू आत्म-साक्षात्कार आणि स्वतःची ओळख दर्शवते. तज्ज्ञ म्हणताता की, टॅटू ही व्यक्तीच्या जीवनातील वाढ खुणावण्याची प्रक्रिया आहे.
काही लोकांना असे वाटते की एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरही, टॅटू चिन्ह आणि आठवणी म्हणून राहतात आणि दुःखाच्या प्रक्रियेदरम्यान सांत्वन देऊ शकतात.
एक टॅटू तुम्हाला भूतकाळातील दुखापतींना सामोरे जाण्यास मदत करू शकते, जे तुम्ही बरे करू शकत नाही.
टॅटूकडे शरीरावरील चिन्ह किंवा दुखापत म्हणून न पाहता धैर्याने टिकून राहण्याचे बॅज म्हणून पाहिले जाऊ शकते.
टॅटू खूप वैयक्तिक आहे. टॅटू कलाकार भानुशाली म्हणतात की विशिष्ट अर्थ दर्शविणारी रचना कधी कधी वेदनादायक, अगदी निराशाजनक देखील असू शकते. परंतु त्या भावनांवर मात करणे ही आपल्या सामर्थ्याची सतत आठवण करून देते.