उन्हाळ्यात व्हेजिटेबल सूपचे सेवन केल्याने शरीर निरोगी राहते आणि उष्णतेचा त्रास कमी होतो. पाहूयात रोज भाज्यांचे सूप प्यायल्याने नेमके कोणते फायदे होतात.
शरीरातील उर्जा टिकवण्यासाठी आणि दिवसभर फ्रेश वाटण्यासाठी व्हेजिटेबल सूप उपयुक्त ठरते.
विविध भाज्यांमध्ये नैसर्गिक पोषक तत्त्वं असतात. जी शरीराला आवश्यक ऊर्जा पुरवतात.
सूपमधील अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर असतात.
पचनक्रिया सुधारते:गरम भाज्यांचे सूप पचनक्रियेस चालना देते आणि अपचन, गॅसेससारख्या समस्या दूर करते.
जेवणाआधी सूप प्यायल्याने भूक वाढते आणि पचनही चांगले होते.
सर्व प्रकारच्या भाज्या बारीक चिरून घ्या आणि पाण्यात उकळून घ्या. उकळलेले पाणी गाळून भाज्या बाजूला काढा.
पाण्यात चवीनुसार मीठ, काळी मिरी पावडर, आलं, लसून घालून पुन्हा उकळा. नंतर त्यात भाज्या परत घालून, हवे असल्यास थोडे व्हिनेगर आणि कॉर्नफ्लॉवरचे पाणी घालून सूप थोडे घट्ट करा आणि गरम गरम सूप सर्व्ह करा.
रोज सकाळी किंवा संध्याकाळी एक गरम वाटी सूप तुम्हाला या उन्हाळ्यात निरोगी ठेवू शकते.