तांदळाचे पाणी हे आरोग्यवर्धक आहे. त्वचेसह आरोग्याच्या अनेक समस्यांसाठी तांदळाच्या पाण्याचा वापर प्रभावी ठरतो.
तांदूळ भिजवल्यानंतरचे उरलेले पाणी किंवा भात शिजवत असताना आलेले पाणी फेकून देऊ नका. जाणून घ्या तांदळाच्या पाण्याचे फायदे
तांदळाच्या पाण्यात मोठ्या प्रमाणावर पोषक तत्वे असतात, व्हिटॅमिन सी आणि ई असतात. हे पाणी प्यायल्याने शरीराला उर्जा मिळते. त्याचबरोबर शरीरातील थकवाही दूर होतो.
तांदळाच्या सेवनाने कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा धोकाही कमी होता. कारण यात मोठ्याप्रमाणात फायबर आढळते.
शिजवलेल्या तांदळाचे पाणी प्यायल्याने रक्ताभिसरण सुरळीत होते. तसंच, पचनक्रीयादेखील सुधारते.
तांदळाचे पाणी कंडिशनर म्हणूनही काम करते. केस धुताना शॅम्पूनंतर केसांवर तांदळाचे पाणी लावा त्यामुळं केसांची वाढ होते.
तांदळाच्या पाण्यात अमीनो आम्ल असते. त्यामुळं केस धुताना या पाण्याचा वापर केल्यास केस गळतीची समस्या नष्ट होईल. आठवड्यातून दोन वेळा हा प्रयोग करुन पाहा
तुम्हाला मुरुमांच्या समस्या असतील तर चेहऱ्यावर तांदळाचे पाणी लावा. रोज रात्री झोपताना चेहऱ्यावर पाणी लावल्याने मुरुमे कमी होतात.
तांदळाचे पाणी त्वचेसाठी क्लीन्झर आणि टोनर म्हणून काम करते. सुरुकुत्यापासून आराम मिळतो. त्वचेवर हे पाणी लावून काही मिनिटे ते तसेच राहून द्यावे. त्यानंतर कोरडे झाल्यानंतर आपला चेहरा धुवा