सर्वांनाच जास्तीत जास्त आयुष्य जगावं लागत. पण यासाठी तुम्हाला फिटनेस राखणे गरजेचे असते. आणि त्यासाठी तुम्हाला सवयींमध्ये बदल करणे आवश्यक आहे.
अशा काही सवयी असतात ज्या तुम्हाला हळुहळू आजारी पाडतात आणि तुमचे वय कमी करतात.
दिवसभर मोबाईल, लॅपटॉप चालवण ही वाईट सवय आहे. यामुळे डोळ्यांसोबत संपूर्ण शरीरावर परिणाम होतो.
प्रमाणापेक्षा जास्त मसालेदार पदार्थ खाणे आरोग्यासाठी नुकसानदायी ठरते. याने बॅड कोलेस्ट्रॉल वाढते. ज्याने कॅन्सरसारखा आजार जडतो.
कमी झोप घेणं हे तुमचे आरोग्य बिघडवू शकते. यामुळे तुमची तब्येत लवकर बिघडू शकते.
जेवताना जास्त मीठ घेण्याची सवय असेल तर आताच सोडा. यामुळे रक्तदाब वाढतो. हे हृदयासाठी चांगले नाही.
रिफाइंड फूड, साखर आणि मैदा शरीरासाठी नुकसानदायी असते. हे पदार्थ तुम्हाला आजारी पाडू शकतात आणि तुमचं वय कमी करु शकतात.
हेल्थी फूड खातानाही ते चांगल्या पद्धतीने चावले जातील याची काळजी घ्या. अन्यथा अनेक त्रासाला सामोरे जावे लागू शकते.
झोपण्याआधी जेवणे शरीरासाठी नुकसानदायी ठरु शकते. झोपण्याआधी किमान 2 तास काही खाऊ नका.
पदार्थ कितीही आवडीचा असला तर एकाचवेळी खूप खाऊ नका. यामुळे स्थूलपणासोबतच ब्लड शुगर वाढू शकते.