फायबर, प्रोटीन, लोह, पोटॅशियम, आयर्न आणि व्हिटॅमिन बी-6 सारख्या शरीरासाठी उपयुक्त पोषक तत्त्वे मनुक्यामध्ये आढळतात.
मनुक्यामध्ये आढळणारे सर्व पोषक तत्व आपल्याला अनेक रोगांपासून वाचवतात आणि शरीर निरोगी आणि आरोग्यदायी ठेवण्यास मदत करतात.
मनुका ठराविक प्रमाणात खाणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते, पण ते जास्त खाण्याचेही काही तोटे आहेत.
जाणून घ्या रोज जास्त प्रमाणात मनुके खाल्ल्याने आरोग्याला काय नुकसान होतील ...
मनुका जास्त प्रमाणात खाल्ल्याने अपचन आणि इतर पचन समस्या होऊ शकतात.
जास्त मनुके खाल्ल्याने किंवा पाणी न पिल्याने डिहायड्रेशन होऊ शकते कारण मनुके पाणी लवकर शोषून घेते.
मनुक्यामध्ये कॅलरीज आणि साखरेचे प्रमाण खूप जास्त असते. त्याच्या अतिसेवनामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढण्याची शक्यता वाढते.
मनुक्यामध्ये उपयुक्त प्रमाणात कॅलरीज आढळतात जे वजन वाढण्यास मद्दत करतात.
काही लोकांना मनुका खाल्ल्यानंतर त्वचेवर पुरळ उठू लागतात किंवा खाज सुटणे आणि सूज येणे यासारख्या समस्या देखील उद्भवू शकतात.