'या' कारणांमुळे येतात डोळ्यांखाली काळी वर्तुळे, आजच बदला सवयी!

Intern
May 21,2025


आजकाल अनेक लोकांच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळे दिसून येतात.


मात्र ही वर्तुळे नेमकी कशामुळे येतात, हे अनेकांना माहीत नसते.


तर पाहूयात कोणत्या कारणांमुळे डार्क सर्कल्स निर्माण होतात.

अपूरी झोप

पुरेशी झोप न मिळाल्यामुळे त्वचा निस्तेज दिसते आणि डोळ्यांखाली काळसरपणा जाणवतो

तणाव आणि मानसिक थकवा

सततचा मानसिक ताण आणि थकवा डोळ्यांखालच्या त्वचेवर परिणाम करून काळी वर्तुळे निर्माण करतो.

डिहायड्रेशन

शरीरात पाण्याची कमतरता असल्यास त्वचा कोरडी आणि निर्जीव होते. ज्यामुळे डोळ्यांखाली काळसरपणा दिसू लागतो.

आनुवांशिकता

काही लोकांना ही समस्या आनुवांशिक असते. कुटुंबातील इतर सदस्यांमध्ये असल्यास ती पुढच्या पिढीतही दिसून येते.

अती प्रमाणात स्क्रीन वापरणे

मोबाईल, लॅपटॉप किंवा टीव्ही स्क्रीनकडे खूप वेळ पाहिल्यामुळे डोळ्यांवर ताण येतो आणि त्यामुळे काळी वर्तुळे निर्माण होतात.

वय वाढल्यामुळे होणारे बदल

वय वाढल्यावर त्वचा पातळ होते आणि रक्तवाहिन्या अधिक स्पष्ट दिसू लागतात. त्यामुळे डोळ्यांखालची त्वचा काळसर वाटते.

अलर्जी किंवा सायनसची समस्या

डोळ्यांच्या आसपास सूज येणे, खाज येणे आणि सायनसच्या समस्येमुळेही काळी वर्तुळे होऊ शकतात.

अयोग्य आहार

शरीराला आवश्यक असलेल्या लोह, व्हिटॅमिन B12 आणि अँटिऑक्सिडंट्सची कमतरता असल्यास डोळ्यांखालची त्वचा निस्तेज आणि काळसर होऊ शकते.

(Disclaimer- वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story