'या' सवयींमुळे वाढू शकतो ब्रेन फॉगचा धोका

केवळ म्हातारपणीच मेंदूवर परिणाम होतो असे नाही. तुमचा मेंदू कसा कार्य करतो हे तुमच्या जीवनशैली आणि आहारावर अवलंबून असते.

बदलत्या जीवनशैलीमुळे लागलेल्या सवयी देखील लवकर विसरणे, गोंधळ यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते.

यूसीएलने केलेल्या अभ्यासानुसार, मानसिक क्षमता झपाट्याने कमी होण्यासाठी धुम्रपान सर्वाधिक कारण आहे.

संशोधन असे दर्शवते की, धुम्रपान करणाऱ्यांमध्ये मेंदू 85% कमी वेगाने काम करतो. याचा अर्थ असा की धुम्रपान सोडणे केवळ तुम्हाला ब्रेन फॉगपासून वाचवू शकते.

संशोधकांचा म्हणण्यानुसार धुम्रपानमुळे शरीरात जळजळ वाढते ज्यामुळे मेंदूच्या पेशींना नुकसान होते. त्याचबरोबर धुम्रपान करणं ब्लड सर्क्युलेशनमध्ये सुद्धा व्यत्यय आणते.

यामुळे मेंदूपर्यंत पोषक तत्व पोहचत नाहीत.ज्यामुळे मेंदूच्या पेशी खराब होतात आणि यामुळे ब्रेन फॉगचा धोका वाढण्याची शक्यता असते. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story