उन्हाळ्यात उष्णतेपासून बचाव करण्यासाठी ताकाचं सेवन केलं जातं. ताकामुळे आपली शरीर हे हायड्रेटेड राहतं.
ताक हे आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर मानलं जातं.
मीठ घालून ताक पिणे हे काही लोकांच्या आरोग्यासाठी घातक ठरतं.
उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या लोकांनी मीठ मिसळलेले ताक पिऊ नये.
मिठामुळे ताकात सोडियमचे प्रमाण वाढतं. जास्त प्रमाणात मीठ सेवन केल्याने उच्च रक्तदाबाची समस्या वाढू शकतं.
किडनीशी संबंधित समस्या असतील तर त्यांनी मीठ मिक्स ताकाचे सेवन करु नयेत.
मूत्रपिंडाच्या समस्या असल्यास, सोडियम आणि पोटॅशियमयुक्त पदार्थांचं सेवन हे नुकसानदायक ठरतं.
आम्ल रिफ्लक्स किंवा गॅस्ट्रोएसोफेजियल रिफ्लक्स रोग (GERD) ग्रस्त लोकांसाठी ताक चांगले नाही.
खरं तर, दुग्धजन्य पदार्थ कधीकधी अँसिड वाढवतं. मीठ घातलेले पदार्थामुळे पोट किंवा अन्ननलिकेला त्रास होतो.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)